11/07/2025
aaple sarkar seva kendra apply

आपले सरकार सेवा केंद्र | नवीन अर्ज सुरु | aaple sarkar seva kendra apply | csc apply

महाराष्ट्र सरकारने नुकताच एक नवा निर्णय घेतलाय. “आपले सरकार सेवा केंद्र” ही योजना आता दुप्पट वेगाने राबवली जाणार आहे. म्हणजे आता प्रत्येक गावात आणि शहरात अधिक केंद्रं उघडली जाणार आहेत. यामुळे लोकांना सरकारी सेवा मिळवणं सोपं होणार आहे. पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे – तुम्ही स्वतःचं “आपले सरकार सेवा केंद्र” सुरू करू शकता आणि त्यातून दरमहा चांगली इन्कम मिळवू शकता.

या लेखातून आपण जाणून घेणार आहोत:

  • ही योजना नक्की काय आहे?
  • अर्ज कसा करायचा?
  • पात्रता काय आहे?
  • लागणारी डॉकेमेंट्स कोणती?
  • कमाई कशी होते?
  • आणि अजून बरंच काही…

“आपले सरकार सेवा केंद्र” म्हणजे काय?

“आपले सरकार सेवा केंद्र” म्हणजे एक असा छोटासा ऑफिस जिथे लोक सरकारी सेवा मिळवण्यासाठी येतात. उदाहरणार्थ:

  • जात प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • अधिवास सर्टिफिकेट
  • रेशन कार्ड
  • सातबारा उतारा
  • आणि अशा 50+ सरकारी सेवा

पूर्वी हे सेंटर कमी होते. त्यामुळे लोकांना खूप त्रास व्हायचा. रांगा लागायच्या. वेळ वाया जायचा. पण आता सरकारने 27 मार्च 2025 ला एक GR (शासन निर्णय) काढून ही संख्या वाढवण्याचा निर्णय घेतलाय.


का सुरू करावा “आपले सरकार सेवा केंद्र”?

कारण ही आहे एक गोल्डन इन्कम अपॉर्च्युनिटी. बघा काय फायदे आहेत:

  • सरकारी मान्यता मिळणार.
  • दरमहा चांगली कमाई.
  • घराजवळच काम.
  • लोकांना मदत करायची संधी.
  • स्वतःचा बिझनेस चालवता येतो.

हे सेंटर चालवणाऱ्या व्यक्तींना आता मानधनात वाढ दिली जाणार आहे. म्हणजे तुमचं काम अधिक इन्कम देणारं होणार आहे.


किती सेंटर कुठे मिळणार?

शासन निर्णयानुसार खालील प्रमाणे सेंटर वाटप होणार आहे:

परिसरलोकसंख्यासेंटरची संख्या
ग्रामपंचायत क्षेत्र< 50002 सेंटर
ग्रामपंचायत क्षेत्र> 50004 सेंटर
नगरपंचायत> 50004 सेंटर
महानगरपालिकाप्रति 25000 लोक2 सेंटर
नगरपरिषदप्रति 10000 लोक2 सेंटर

अर्ज कधी आणि कुठे करायचा?

GR नुसार 27 मार्च 2025 रोजी शासन निर्णय निघाला. त्यानंतर 30 दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये अर्ज उपलब्ध होतील. म्हणजेच 27 एप्रिल 2025 पासून अर्ज करता येतील.

तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन किंवा वेबसाइटवरून फॉर्म मिळवा. किंवा तुमच्या ग्रामपंचायत / नगरपरिषद मध्ये सुद्धा विचारणा करा.


अर्जासाठी लागणारी कागदपत्रे (Documents)

तुम्ही जेव्हा अर्ज कराल, तेव्हा खालील डॉकेमेंट्स लागतील:

  1. ✅ आधार कार्ड
  2. ✅ पॅन कार्ड
  3. ✅ दहावी / बारावी पास मार्कशीट
  4. ✅ शाळा सोडल्याचा दाखला
  5. ✅ चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र
  6. ✅ MS-CIT किंवा संगणक साक्षरतेचं प्रमाणपत्र
  7. ✅ CSC सर्टिफिकेट (जर नसेल तर नंतर मिळवा)
  8. ✅ लोकेशन फोटो + मॅप
  9. ✅ भाडे करार / मालकी हक्काचं लाईट बिल
  10. ✅ शॉप ॲक्ट लायसन्स
  11. ✅ पासपोर्ट साईझ फोटो

पात्रता (Eligibility)

सेंटर सुरू करण्यासाठी काही अटी आहेत:

  • स्थानीय रहिवासी असणं गरजेचं आहे.
  • गव्हर्मेंट नोकरदार नसावा.
  • किमान दहावी पास असणं गरजेचं आहे.
  • तुमच्याकडे 10×10 स्क्वेअर फीट जागा असावी.
  • चारित्र्य प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
  • संगणक वापरता येणं आवश्यक आहे.

आवश्यक यंत्रसामग्री (Infrastructure)

हे सेंटर चालवण्यासाठी काही बेसिक उपकरणं लागतात:

  • कंप्युटर किंवा लॅपटॉप
  • बायोमेट्रिक डिव्हाईस (थंब स्कॅनर)
  • प्रिंटर
  • वेबकॅम
  • स्कॅनर
  • इंटरनेट कनेक्शन

कमाई किती होईल?

सेवा फीतुमचा वाटा
₹50 अर्ज फी₹32.50 मिळतात (65%)
₹100 घरपोच सेवा₹80 तुमचे (20 रु महा-IT ला)

महिन्याला 15-20 अर्ज झाले तरी साधारण ₹5000 ते ₹15000 कमाई सहज शक्य आहे.!


कोणकोणत्या सेवा देता येतील?

“आपले सरकार सेवा केंद्र” वरून खालील 50+ सेवा देता येतात:

aaple sarkar seva kendra apply
aaple sarkar seva kendra apply
  • जात प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • अधिवास प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट
  • भूमिहीन दाखला
  • शेतकरी दाखला
  • सातबारा उतारा
  • अल्पभूधारक सर्टिफिकेट
  • वृद्ध नागरिक दाखला
  • रेशन कार्ड
  • लायसन्स
  • वोटर ID
  • बँक खाते उघडणे
  • पेंशन योजना अर्ज
  • PM किसान, श्रमिक कार्ड
  • हेल्थ ID
  • आणि बरंच काही…

अर्ज कसा करायचा?

  1. तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जा.
  2. तिथे “आपले सरकार सेवा केंद्र” चा फॉर्म मागा.
  3. सगळी डॉकेमेंट्स संकलित करा.
  4. फॉर्म भरून सबमिट करा.
  5. तुमचा फॉर्म व्हेरिफाय झाल्यावर तुम्हाला अधिकृत परवानगी मिळेल.

महत्त्वाचे टिप्स

  • फॉर्म सुटण्याआधी सगळी कागदपत्रं तयार ठेवा.
  • वेळेत अर्ज करा, कारण वेटिंग लिस्ट लागू शकते.
  • फॉर्म भरण्याच्या आधी चारित्र्य प्रमाणपत्र काढा.
  • कंप्युटर साक्षरतेचं प्रमाणपत्र तयार ठेवा.
  • तुमचं लोकेशन ग्रामीण / शहरी असेल त्यानुसार योजना वेगळी आहे.

आपले सरकार सेवा केंद्र

घटकमाहिती
🗓️ योजना सुरू झाल्याची तारीख27 मार्च 2025 (शासन निर्णय)
📍 अर्ज सुरू होण्याची तारीख27 एप्रिल 2025 (30 दिवसात अर्ज सुरू होतील)
🧾 सेवा प्रकार50 पेक्षा अधिक सरकारी सेवा (जात, उत्पन्न, अधिवास, सातबारा, इ.)
💼 कोण चालवू शकतो?दहावी पास, रहिवासी, गव्हर्मेंट नोकरदार नसलेली व्यक्ती
📌 आवश्यक जागाकिमान 10×10 स्क्वेअर फूट ऑफिस
💻 लागणारी उपकरणेकंप्युटर, प्रिंटर, बायोमेट्रिक, इंटरनेट, स्कॅनर
💰 कमाई किती होऊ शकते?दरमहा ₹5000 ते ₹15000+ (सेवांवर अवलंबून)
🧾 अर्जासाठी लागणारी कागदपत्रेआधार, पॅन, मार्कशीट, MS-CIT, चारित्र्य प्रमाणपत्र, शॉप ॲक्ट इ.
🌍 कुठे अर्ज करायचा?जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत/नगरपरिषद, अधिकृत वेबसाईट
⚠️ अटीस्थानिक रहिवासी, संगणक साक्षरता, गव्हर्मेंट कर्मचारी नसावा

आपले सरकार सेवा केंद्र अर्ज प्रक्रिया

Q1: आपले सरकार सेवा केंद्र म्हणजे काय?
उत्तर: हे एक सरकारी मान्यताप्राप्त केंद्र आहे जिथून सामान्य लोकांना विविध सरकारी सेवा मिळतात, जसे जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, रेशन कार्ड इत्यादी.


Q2: मी अर्ज कधी करू शकतो?
उत्तर: GR नुसार 27 मार्च 2025 रोजी निर्णय जाहीर झाला आहे. त्यानंतर 30 दिवसात म्हणजे 27 एप्रिल 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.


Q3: अर्ज कुठे करायचा?
उत्तर: जिल्हाधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत, नगरपरिषद यांच्याकडे फॉर्म मिळतील.


Q4: मी दहावी पास आहे, तरी चालेल का?
उत्तर: हो, दहावी पास असणं किमान पात्रता आहे. त्यासोबत संगणक साक्षरता (MS-CIT) असावी.


Q5: माझ्याकडे जागा नाही, मी भाड्याने जागा घेतली आहे, चालेल का?
उत्तर: हो. तुम्ही भाडे करारनामा आणि संबंधित मालमत्तेचं लाईट बिल दिल्यास भाड्याची जागा सुद्धा चालते.


Q6: कमाई कशी होते आणि किती होऊ शकते?
उत्तर: प्रत्येक सेवेसाठी तुम्हाला कमिशन दिलं जातं. उदाहरणार्थ, ₹50 मध्ये ₹32.50 तुमचं असतं. महिन्याला साधारण ₹5000 ते ₹15000 कमवू शकता.


Q7: मी आधीपासून CSC (कॉमन सर्विस सेंटर) चालवतो, तरी अर्ज करू शकतो का?
उत्तर: हो, पण स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल आणि तुमचं सेंटर संबंधित क्षेत्रात नोंदलेलं असणं गरजेचं आहे.


Q8: मी MS-CIT केलं नाही, तर काय?
उत्तर: MS-CIT किंवा तत्सम संगणक साक्षरतेचं प्रमाणपत्र लागेल. नसेल तर ते करून घ्या आणि नंतर अर्ज करा.


Q9: किती सेंटर मिळणार आहेत?
उत्तर: लोकसंख्येच्या आधारावर सेंटरची संख्या निश्चित केली जाते. उदाहरणार्थ, ग्रामपंचायत क्षेत्रात 2 ते 4 सेंटर, महानगरपालिकेत दर 25000 लोकसंख्येमागे 2 सेंटर इ.


Q10: अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आहे का?
उत्तर: सध्या ती ऑफलाईन आहे. पण भविष्यात जिल्हाधिकारी वेबसाईटवर अर्ज प्रक्रिया ऑनलाईन सुरू होऊ शकते.