कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की आपण किंवा आपले कोणी जवळचे व्यक्ती एखाद्या गंभीर आजाराने त्रस्त असतात. या परिस्थितीत आर्थिक अडचणी मोठ्या अडथळ्याचं काम करतात. “कैंसर” हा अशाच गंभीर आणि खर्चिक आजारांपैकी एक आहे. भारत सरकारने सुरू केलेला एक महत्वाचा उपक्रम म्हणजे PMNRF – प्रधानमंत्री राष्ट्रीय राहत कोष.
हा लेख विशेषतः कैंसर पेशंट्स साठी आहे, पण इतर गंभीर आजारांवरही याच प्रक्रियेतून मदत मिळू शकते. जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला ही माहिती उपयोगी वाटली तर कृपया लेख शेअर करा. ही मदत एखाद्याचे प्राण वाचवू शकते.
पीएमएनआरएफ ची स्थापना कशी झाली?
PMNRF ची स्थापना 1948 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली होती. तेव्हा भारत-पाकिस्तान फाळणीमुळे विस्थापित लोकांना मदत करण्यासाठी हा फंड तयार केला गेला होता.
आजच्या घडीला, PMNRF चा उपयोग नैसर्गिक आपत्तींमधून पीडित लोकांना मदत करण्यासाठी केला जातो – उदाहरणार्थ:
- Flood (पूर)
- Earthquake (भूकंप)
- Cyclone (वादळ)
- Man-made disasters – Riots, Bomb blasts, etc.
याशिवाय, हा फंड गंभीर आजारांनी पीडित नागरिकांना आर्थिक मदत देण्यासाठीही वापरला जातो.
कोणते आजार PMNRF मध्ये कव्हर होतात?
या फंडद्वारे खालील आजारांवर मदत दिली जाते:
- Cancer (कॅन्सर)
- Kidney transplant (किडनी ट्रान्सप्लांट)
- Heart surgery (हार्ट सर्जरी)
- Acid attack victims (ॲसिड हल्ल्यातील पीडित)
- इतर काही गंभीर आणि खर्चिक आजार
कोण पात्र आहे? (Eligibility Criteria)
PMNRF साठी अर्ज करण्यासाठी काही ठराविक अटी आहेत:
- वार्षिक उत्पन्न ₹1 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावं.
- उपचार सरकारी रुग्णालयात चालू असावेत, किंवा PMNRF मध्ये नोंदणीकृत प्रायव्हेट हॉस्पिटल्स मध्ये.
- अर्ज करणारा व्यक्ती पेशंटचा जवळचा नातेवाईक असावा – जसं की वडील, आई, पत्नी, पती, मुलगा इ.
PMNRF अंतर्गत येणाऱ्या प्रायव्हेट हॉस्पिटल्सची लिस्ट तुम्हाला pmnrf.gov.in या अधिकृत वेबसाइटवर मिळेल.
लागणारे डॉक्युमेंट्स (Required Documents)
PMNRF साठी अर्ज करताना खालील डॉक्युमेंट्सची आवश्यकता असते:
1. Hospital Estimate Letter
- डॉक्टरने दिलेलं ट्रीटमेंट estimate
- आजाराचं नाव, औषधांचा अंदाजित खर्च
- डॉक्टरचं नाव, रजिस्ट्रेशन नंबर आणि हॉस्पिटलचा स्टॅम्प
2. Income Certificate
- SDM किंवा तहसीलदार यांच्याकडून मिळालेलं
- पेशंट किंवा अर्जदाराचं उत्पन्न दाखवणारं प्रमाणपत्र
3. अर्ज (Application Letter) ₹10 स्टॅम्प पेपरवर
- अर्ज पेशंटच्या नातेवाईकाकडून लिहिलेला असावा
- अर्जामध्ये असावं:
- अर्जदाराचं नाव, पत्ता, उत्पन्न
- पेशंटशी नातं
- पेशंटचं नाव
- उपचारांचा अंदाजित खर्च
- आर्थिक दुर्बलतेचं कारण
4. Aadhaar Card / Voter ID
- पेशंट आणि अर्जदाराचे
5. PMNRF Application Form
- pmnrf.gov.in वरून डाऊनलोड करता येईल
6. Passport Size Photograph
- पेशंटचे रंगीत फोटो
7. Bank Passbook Copy
- पेशंट किंवा अटेंडंटच्या बँक खात्याची कॉपी
- Account Number स्पष्ट दिसणं गरजेचं
8. MP Recommendation Letter
- स्थानिक खासदाराच्या लेटरहेडवरून, माननीय पंतप्रधानांच्या नावाने
- पत्रात असावं:
- अर्जदाराचं नाव
- तो/ती त्यांच्या मतदारसंघातील रहिवासी आहे हे स्पष्ट करणं
- हॉस्पिटल, आजार व उपचार खर्चाची माहिती
- पीएमएनआरएफ कडून मदतीची विनंती
अर्ज कसा करावा? (How to Apply?)

तयार डॉक्युमेंट्स सादर करण्याचे तीन मार्ग आहेत:
1. स्वतः जाऊन सादर करा:
- प्रधानमंत्री कार्यालय, साऊथ ब्लॉक, नवी दिल्ली – 110001 येथे
2. Registered Post / Speed Post द्वारे पाठवा:
- सगळ्या फोटोकॉपीज व्यवस्थित फाईल मध्ये लावून, रजिस्टर पोस्टने पाठवा
3. तुमचे MP स्वतः कार्यालयात पाठवू शकतात:
- MP नी सगळे डॉक्युमेंट्स त्यांच्या लेटरसोबत पंतप्रधान कार्यालयात सादर करावेत
पुढची प्रक्रिया (After Application)
- अर्ज जमा केल्यावर, तहसीलदार कडून इन्क्वायरी केली जाते
- अर्जात दिलेली माहिती खरी असल्याचं सिद्ध झाल्यास, पुढील निर्णय PMO (Prime Minister Office) घेते
मदतीचा निर्णय (Sanctioning of Grant)
जर तुमचा अर्ज मंजूर झाला, तर:
- PMO कडून हॉस्पिटलच्या नावाने एक पत्र येते
- त्या पत्रात तुम्हाला मिळणाऱ्या मदतीची मर्यादा (Approved Limit) लिहिलेली असते
- तुम्ही ते पत्र घेऊन हॉस्पिटलमध्ये सादर करावं
- हॉस्पिटल तुमचं ट्रीटमेंट PMNRF द्वारे सुरू करेल
काही महत्वाच्या अटी (Important Conditions)
- रक्कम थेट तुमच्या खात्यात येत नाही – ती हॉस्पिटलला दिली जाते
- OPD किंवा साध्या टेस्ट्स साठी ही रक्कम वापरता येत नाही
- Hospital Admission किंवा Major Tests (जसं की PET-CT Scan) असतील तरच याचा वापर शक्य आहे
- पूर्वीच्या खर्चासाठी Reimbursement मिळत नाही
- Max Limit – ₹3 लाख रुपये
- हा लाभ फक्त एकदाच मिळतो – Lifetime once only
- जर 2 वर्षांच्या आत रक्कम वापरली नाही, तर ती रद्द (Null & Void) होईल
इतर पर्याय – Fundraising आणि Generic Medicines
1. Fundraising Websites:
जर PMNRF मधून मर्यादित मदत मिळाली, तर तुम्ही खालील वेबसाइट्सचा उपयोग करू शकता:
- Impact Guru
- Milaap
- Ketto
Fundraising Types:
a) Self Promotion Campaign
- तुमचं स्वतःचं फंडिंग पेज तयार होतं
- लिंक फ्रेंड्स आणि नातेवाईकांना शेअर करून मदत मिळवता येते
b) Promotional Fundraising Campaign
- Fundraising कंपनी तुमचं प्रोफेशनल व्हिडीओ तयार करते
- ते सोशल मीडियावर प्रमोट केलं जातं
- यात काही प्रमाणात चार्जेस लागतात
2. Generic Medicines:
- कधी कधी Patent Medicine पेक्षा Generic Medicine खूपच स्वस्त असते
- तुमचे Oncologist (कॅन्सर डॉक्टर) यांच्याकडून Generic पर्याय विचारावा
- फक्त अधिकृत दुकानातूनच औषधे खरेदी करावीत
- मार्केटमध्ये डुप्लिकेट्स खूप असतात, त्यामुळे काळजी घ्या
निष्कर्ष | PMNRF
कॅन्सरसारख्या गंभीर आजारासाठी PMNRF ही एक खूप उपयोगी योजना आहे. ₹3 लाख मदत जरी पूर्ण खर्च भागवत नसेल, तरी तो एक सुरुवातीचा मोठा आधार ठरू शकतो. जर तुम्ही या योजनेची सर्व प्रोसेस योग्य प्रकारे फॉलो केली, तर सरकारी मदत नक्की मिळू
PMNRF
विषय / Category | माहिती / Details |
---|---|
योजना नाव | प्रधानमंत्री राष्ट्रीय राहत कोष (PMNRF) |
स्थापना वर्ष | 1948 (पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुरु केली) |
उद्देश | नैसर्गिक आपत्तीत, गंभीर आजारांमध्ये आर्थिक मदत |
लाभार्थी | आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गंभीर आजारांनी ग्रस्त नागरिक |
मदतीची कमाल रक्कम | ₹3,00,000 (फक्त एकदाच – lifetime once only) |
कव्हर होणारे आजार | कॅन्सर, हार्ट सर्जरी, किडनी ट्रान्सप्लांट, ॲसिड हल्ला इ. |
उपचार कुठे करावेत? | सरकारी हॉस्पिटल किंवा PMNRF-मान्यताप्राप्त प्रायव्हेट हॉस्पिटल |
मदत कोणाला दिली जाते? | थेट हॉस्पिटलला – रुग्णाच्या खात्यात नाही |
अर्ज कोण करू शकतो? | पेशंटचा जवळचा नातेवाईक (आई-वडील, पती-पत्नी, मुले इ.) |
लागणारे डॉक्युमेंट्स | Estimate, Income Certificate, Aadhaar, Bank Copy, Photo, MP Recommendation इ. |
अर्ज सादर करण्याचे मार्ग | PMO ला प्रत्यक्ष, Registered Post, किंवा MP कडून |
Website | pmnrf.gov.in |
संपर्क पत्ता | Prime Minister’s Office, South Block, New Delhi – 110011 |
PMNRF
1. PMNRF म्हणजे काय?
उत्तर:
PMNRF (Prime Minister’s National Relief Fund) ही एक सरकारी योजना आहे जी नैसर्गिक आपत्ती, दंगली, बॉम्बस्फोट आणि गंभीर आजारांनी ग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत पुरवते.
2. कॅन्सर पेशंट PMNRF साठी अर्ज करू शकतो का?
उत्तर:
होय, कॅन्सर, हार्ट सर्जरी, किडनी ट्रान्सप्लांट, ॲसिड हल्ला यांसारख्या गंभीर आजारांमध्ये PMNRF कडून आर्थिक मदत मिळू शकते.
3.कोण अर्ज करू शकतो?
उत्तर:
रुग्ण स्वतः किंवा त्याचे जवळचे नातेवाईक (पती, पत्नी, पालक, मुलगा/मुलगी) अर्ज करू शकतात.
4.PMNRF साठी अर्ज करण्याची प्रमुख अटी कोणत्या आहेत?4..
उत्तर:
- अर्ज करणाऱ्याचे वार्षिक उत्पन्न ₹1 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- उपचार सरकारी हॉस्पिटल किंवा PMNRF-मान्यताप्राप्त प्रायव्हेट हॉस्पिटल मध्येच चालू असावा.
5.किती आर्थिक मदत मिळते?
उत्तर:
जास्तीत जास्त ₹3,00,000 पर्यंतची मदत मिळू शकते. यासाठी PMO कडून अंतिम निर्णय घेतला जातो.
6.या योजनेचा लाभ किती वेळा घेता येतो?
उत्तर:
PMNRF चा लाभ पूर्ण आयुष्यात फक्त एकदाच घेता येतो.
7.किती वेळात मदतीचा निर्णय होतो?
उत्तर:
संपूर्ण कागदपत्रं सादर केल्यानंतर, तहसीलदारमार्फत चौकशी होते. त्यानंतर PMO निर्णय घेतो. वेळ 1-3 महिने लागू शकतो.
8.PMNRF साठी लागणारी कागदपत्रं कोणती?
उत्तर:
- हॉस्पिटलचा ट्रीटमेंट estimate
- इनकम सर्टिफिकेट (तहसीलदार कडून)
- ₹10 स्टँप पेपरवर नोंदवलेली प्रार्थना पत्र
- आधार / वोटर ID
- पासपोर्ट साइज फोटो
- बँक पासबुक कॉपी
- PMNRF अर्ज फॉर्म
- MP (सांसद) कडून शिफारसपत्र
9.PMNRF चा अर्ज कुठे व कसा पाठवावा?
उत्तर:
तीन पद्धतीने अर्ज पाठवता येतो:
- स्वतः PMO (South Block, Delhi) ला जाऊन
- Registered/Speed Post ने
- स्थानिक MP मार्फत
10.मदतीची रक्कम कुणाला मिळते?
उत्तर:
थेट हॉस्पिटलला रक्कम ट्रान्सफर केली जाते. रुग्णाच्या खात्यावर ती रक्कम येत नाही.
11.या पैशांचा वापर कोणत्या गोष्टींसाठी करता येतो?
उत्तर:
- हॉस्पिटल अॅडमिशनसाठी
- सर्जरी किंवा मेजर टेस्ट्स (PET Scan, MRI वगैरे)
OPD, चाचण्या किंवा औषध खरेदीसाठी या पैशाचा वापर करता येत नाही.
12.जर आधीच खर्च झाला असेल, तर reimbursement मिळतो का?
उत्तर:
नाही. PMNRF हा reimbursement फंड नाही. केवळ पुढच्या खर्चासाठीच वापरता येतो.
13.मला PMNRF form कुठे मिळेल?
उत्तर:
pmnrf.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज फॉर्म डाउनलोड करता येतो.
15.मदत न मिळाल्यास दुसरे पर्याय कोणते आहेत?
उत्तर:
- Fundraising Websites – ImpactGuru, Milaap, Ketto इत्यादी
- Generic Medicines – जे पेटेंटेड औषधांपेक्षा खूपच स्वस्त असतात
- NGOs व Social Groups – जे आर्थिक सहकार्य करतात
- नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025 | प्रमोशन | कामाचे स्वरूप | Nondani V Mudrank Vibhag Bharti
- आनंदाची बातमी | सरळसेवा भरती नवीन जाहिरात आली | पद – शिपाई | Igr Maharashtra Bharti 2025
- आरोग्य विभाग भरती 2025 – GMC नांदेड गट ड नवीन माहिती
- उच्च न्यायालय भरती 2025 | नवीन जाहिरात जाहीर | ऑनलाईन अर्ज सुरु | पगार ₹29,200 ते ₹92,300 व भत्ते | Bombay High Court Bharti 2025
- जिल्हा परिषद भरती आरोग्य विभाग | विविध पदांची भरती २०२५ | ZP Pune Ayush Recruitment 2025